नारायण राणेंचं मंत्रिपद मोठं त्यांनी कोकणचा कायापालट करावा

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी राणे कुटुंबीय सोडताना दिसून येत आहे त्यातच आता शिवसेना नेते आणि माजी मंत्री नारायण राणेंचे कट्टर विरोधक माजी मंत्री दीपक केसरकर यांनी मोलाचा सल्ला नारायण राणे यांना दिला आहे.

नारायण राणेंनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करून जे मंत्रिपद मिळवलं आहे. त्याच्या माध्यमातून कोकणचा काया पालट करावा ते त्यांच्या हातात आहे. त्यांनी जर विकास केला तर आम्ही त्यांचे निश्चितच कौतुक करू, अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे.

पुढे केसरकर म्हणाले की, ५० ग्रॅम १०० ग्रॅम ड्रग्ज पकडायचे आणि सेलिब्रिटींच्या छोट्या-मोठ्या मुलांना उभं करायचं आणि त्यांना या प्रकरणात अडकावयच. ड्रग्ज या देशातून हद्दपार झाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. यासाठी गुजरात वरून येणाऱ्या ड्रग्स रॅकेट आधी उध्वस्त करा, असं दीपक केसरकर म्हणाले.

Team Global News Marathi: