नारायण राणेंनंतर मोहित कंबोज यांना मुंबई मनपाने बजावली नोटीस

 

मुंबई | भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्यातील बेकायदा बांधकामप्रकरणी मुंबई महानगर पालिकेने दुसऱ्यांदा नोटीस पाठवली होती. यापूर्वी पाठविलेल्या नोटिसीनुसार घेण्यात आलेल्या सुनावणीत राणे यांनी बंगल्यातील अंतर्गत बांधकाम नियमानुसार असल्याचा दावा वकिलांमार्फत केला होता.

मात्र, पालिका प्रशासनाने हा दावा फेटाळत अंतर्गत बांधकाम बेकायदाच ठरवले आहे. तसेच पुन्हा नोटीस पाठवून दिलेल्या १५ दिवसांच्या मुदतीमध्ये हे बांधकाम हटविण्याची सूचना केली आहे. तर त्यापूर्वी अभिनेत्री कंगना रणौत हीच्या कार्यालयावर मुंबई महानगर पालिकेनं केलेली कारवाई चांगलीच गाजली होती. आता यानंतर पालिकेनं देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मोहित कंबोज यांना कलम ४८८ नुसार एक नोटी पाठवली आहे. यावर ट्वीट करत कंबोज यांनी पालिकेवर निशाणा साधलाय.

कंबोज आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत की,  “माझ्यावर खोटी केस करता आली नाही, तर माझ्या घरी पालिकेची नोटीस पाठवली. कंगना रणौत असो किंवा नारायण राणे काही करता आलं नाही, तर घर तोडा. हेदेखील ठीक. काहीही करा, मी महाविकास आघाडी सरकार तुमच्या समोर झुकणार नाही,” अशी प्रतिक्रिया मोहित कंबोज यांनी दिली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. दरम्यान, उद्या पालिकेची टीम त्यांच्या घरात काही अनधिकृत बांधकाम झालं आहे का याची तपासणी करणार आहे.

Team Global News Marathi: