प्रवीण दरेकरांकडून मुंबई बँकेत दोन हजार कोटींचा घोटाळा, भाई जगताप यांनी लगावला गंभीर आरोप

 

मुंबई | भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई जिल्हा सहकारी बँकेत सहा वर्षांत दोन हजार कोटींचा घोटाळा केला. तसेच त्यांच्या घोटाळ्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घातत त्याचे समर्थन केले होते, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

दरेकर यांच्यावर अटकेची कारवाई करण्याबरोबरच या तिघांनी नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरेकर यांनी २०१३-१४ ते २०१९-२० या कालावधीत घोटाळा केल्याचे सांगत जगताप म्हणाले की, दरेकर यांना पाठीशी घालणारे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील तसेच संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी. तर मजूर म्हणून नोंद असलेले दरेकर यांच्या २००० कोटींचा घोटाळा सहकार विभागाच्या चौकशी अहवालामध्ये उघड झाला आहे.

पुढे बोलताना जगताप म्हणाले की, दरेकर यांची ज्या प्रतिज्ञा सहकारी मजूर संस्थेत मजूर म्हणून नोंदणी आहे, तेथे ते कागदोपत्री रंगारी मजूर असल्याचे दिसते. सहकार विभागाच्या अहवालानुसार प्रतिज्ञा मजूर संस्थेतील मजूर म्हणून नोंदणी असलेले जवळपास सर्व सदस्य हे बोगस मजूर आहेत, असेही ते म्हणाले.

Team Global News Marathi: