विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत कुणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे पंकजा यांचं नाव याआधीदेखील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी चर्चेत आलं होतं. पण त्यावेळी भाजपकडून त्यांना संधी देण्यात आली नव्हती. आतादेखील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे या निवडणुकीत तरी त्यांना संधी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पंकजा यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळावी का? याबाबत त्यांनी आज मोठं विधान केलं. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पंकजा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पात्र असल्याचं विधान केलं. त्यामुळे विधानपरिषदेच्या 10 जागांसाठीच्या आगामी निवडणुकीत कदाचित पंकजा यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? “पंकजा मुंडे यांच्याबद्दल नाराजी वगैरे नाही. पंकजा आमच्या सिनियर नेत्या आहेत. ज्यावेळी एखादी निवडणूक येते त्यावेळेस त्यांचं नाव चर्चेत येणं हे साहजिक आहे. त्यामुळे त्यात काही वावगं नाही. कारण त्या कोणत्याही पदाकरता एलिजिबलच आहेत. त्या संदर्भातील निर्णय हायकमांडला घ्ययाचा आहे. आमच्या सर्वांकडून त्यांच्या नावाला पूर्णपणे सकारात्मक पाठिंबा आहे. त्या आणि आमचे हायकमांड दोन्ही मिळून या संदर्भात निर्णय घेतील”, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.