‘नाना तुझ्या आव्हानाला प्रतिआव्हान देतोय. हिंमत असेल तर उद्या सकाळी दहा वाजता येऊनच दाखल’

 

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस विरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेस सोमवारी आंदोलन करणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानासमोर काँग्रेस आंदोलन करणार आहे. पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

काँग्रेसने आंदोलन करत भाजपने माफी मागावी, यासाठी नाना पटोलेंच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाने देखील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना आव्हान दिले आहे. या आंदोलनाला भाजपने जशास तसे उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये आज मोठा राडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काँग्रेसच्या आंदोलनाआधीच भाजप नेत्यांनी काँग्रेसला आव्हान दिलं आहे. काँग्रेसच्या आंदोलनाला भाजप जशास तसे उत्तर देणार आहे. काँग्रेसच्या देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होणाऱ्या आंदोलनाला भाजपची उत्तर देण्याची तयारी केली आहे. भाजप नेते आशिष शेलार आणि प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात भाजपचे कार्यकर्ते उत्तर देणार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानाबाहेर संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.

काँग्रेसच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर भाजप देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसने खरंच हिंमत असेल तर फडणवीसांच्या बंगल्याबाहेर आंदोलनाला येऊन दाखवावे, त्यांना भाजप कार्यकर्ते प्रत्युत्तर देतील, असा इशारा भाजप नेत्यांकडून देण्यात आला आहे. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी ट्विटरवर एक विडिओ शेअर करून थेट नाना पटोले यांना आव्हान दिले आहे.

भाजप नेते प्रसाद लाड यांनी ट्विटरवर त्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत त्यांना नाना पटोले यांना प्रतिआव्हान दिलं आहे. ‘नाना तुझ्या आव्हानाला प्रतिआव्हान देतोय. हिंमत असेल तर उद्या सकाळी दहा वाजता येऊनच दाखल. नाही तुला उलटा प्रसाद दिला तर आम्हीदेखील भाजपवासी नाही! सागरवर तू ये पाहतो मी तू कसा जातो त’, असं प्रसाद लाड म्हणाले आहेत.

 

Team Global News Marathi: