काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पाटोले यांचे नाव आघाडीवर ?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पाटोले यांचे नाव आघाडीवर ?

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार या संदर्भात राज्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेस नव्या चेहऱ्याला संधी देणार की जुन्या आणि अनुभवी नेत्याची वर्णी लावणार अशी चर्चा रंगताना दिसत होती. मात्र, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पटोले यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचीच जास्त उत्सुकता वाढलेली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी विजय वडेट्टीवार हे इच्छुक आहेत. तसे त्यांनी बोलूनही दाखवले होते. दरम्यान, या पदासाठी राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे नाव पुढे आले होते. तसेच राज्यातील मंत्री विजय वडेट्टीवार यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र गुजरात विधानसभा निवडणुका लक्षात घेता तिथले प्रभारी असलेले राजीव सातव हे राज्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून येण्याची शक्यता कमी आहे.

तर काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झालेल्या संध्या सव्वालाखे या तेली समाजाचे असल्याने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी तेली समाजाचे असलेले वडेट्टीवार येण्याची शक्यताही मावळली आहे. त्यामुळे राज्यात प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचेच नाव आघाडीवर आहे. नाना पटोले हे सध्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: