‘पूछता है भारत’ म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा भाजपावर जोरदार निशाणा

‘पूछता है भारत’ म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा भाजपावर जोरदार निशाणा

ग्लोबल न्यूज: व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधील माहितीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये काही मंत्र्यांबाबत आक्षेपार्ह विधाने असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर आता या चॅटबाबच अजून एक धक्कादायक गौप्यस्फोट करण्यात आला आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि आडमार रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. “लोकांचे विषय मांडणारे लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपाभक्त पत्रकाराला भाजपच्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. आता या कथित पत्रकाराचा खरा चेहरा पुढं आल्यानंतरही तो आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? हे भाजपच्या त्या नेत्यांनी सांगावं” असं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे.

https://twitter.com/RRPSpeaks/status/1351400204201693186?s=19

फक्त सांगणे पुरेसं नाही किंबहुना केंद्रात सत्ताही त्यांचीच आहे. त्यामुळं या कथित पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की सोयीस्कर पाठीशी घातलं जाईल, ‘यही पुछता है भारत!'” असं देखील रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: