काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले तर प्रणिती शिंदेंसह ६ जण कार्यकारी अध्यक्ष

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले तर प्रणिती शिंदेंसह ६ जण कार्यकारी अध्यक्ष
; पुण्यातील मोहन जोशी आणि रमेश बागवे यांची उपाध्यक्षपदी वर्णी*

मुंबई – ऑल इंडिया काँग्रेस कमिटीनं महाराष्ट्र काँग्रेसमधील पदाधिकार्‍यांच्या नियुक्ती केल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासुन काँग्रेसमध्ये राज्यस्तरावर मोठे फेरबदल होणार असं सांगितलं जात होतं. आज अखेर काँग्रेसच्या अध्यक्षांकडून नवीन पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोण आहेत कार्यकारी अध्यक्ष?म

काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदावर शिवाजी मोघे, बसवराज पाटील, मोहम्मह आरिफ नसीम खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मोहम्मद नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यावर प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपावून काँग्रेसने मुंबई काँग्रेसमधील नाराजी दूर केली आहे. त्याचसोबत काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षांचीही घोषणा दिल्लीतून करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी शिरीष चौधरी, रमेश बागवे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, रणजीत कांबळे, कैलास गोंरट्याल. बी.एल नगराळे, शरद आहेर, एम.एम नाईक, माणिकराव जगताप यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेसप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्येही पक्ष संघटनेत कार्यकारी अध्यक्षपद नव्याने निर्माण करण्यात आले आहे.

 

नाना पटोले यांच्या रुपाने काँग्रेसला आक्रमक प्रदेशाध्यक्ष मिळाला असून विदर्भाला प्रदेशाध्यक्ष मिळावं ही मागणीही पूर्ण झाली आहे. परंतु आता विधानसभा अध्यक्षपदी कोणाची नेमणूक होणार हे पाहणंही गरजेचे आहे, कारण काँग्रेस उपमुख्यमंत्रिपद घेऊन विधानसभा अध्यक्षपदावरील दावा सोडण्यास तयार असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.या सर्व नियुक्त्या दिल्लीतून झाल्या आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: