जेव्हा राणेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला, त्यावेळेस नेमकं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले वाचा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. त्यात राणे परिवार ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. पण त्याच राणेंवर चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करण्याची वेळ आली. याची माहिती खुद्द नारायण राणे यांनी दिलेली आहे.

नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेजची स्थापना केली आहे. त्याचा उद्या शनिवारी देशाचे गृहमंत्री अमित शहा तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या मेडिकल कॉलेजच्या काही फायली मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात आल्या होत्या. त्यानिमित्ताने राणेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करावा लागला. स्वत: राणेंनीच त्याची माहिती दिली.

परवानगीसाठी फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेली होती. त्यावेळी मी त्यांना फोन केला. तुमच्याकडे परवानगीसाठी फाईल आली आहे, सही करा असे त्यांना सांगितले. त्यावर मुख्यमंत्री ठीक आहे बोलले. ते म्हणाले, माझ्याकडे फाईल आली आहे का? मी म्हटले, जीआर काढा. रुटीन फाईल आहे. तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले बरं. आमच्या दोघांमध्ये तेवढाच संवाद झाला, असे राणे यांनी बोलून दाखविले.

Team Global News Marathi: