नागपुरचे ‘निकरवाले’ तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाही – राहुल गांधी

नागपुरचे ‘निकरवाले’ तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाही – राहुल गांधी

तामिळनाडूमध्ये मे महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे.त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपा बरोबर आरएसएसवर जोरदार निशाणा साधला आहे.

आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताचा पाया नष्ट करू देणार नाही. त्यांना हे समजत नाही की तामिळनाडूचं भविष्य केवळ तामीळ जनताच ठरवू शकते. नागपुरचे ‘निकरवाले’ तामिळनाडूचे भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत.” असं म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भर सभेतून पंतप्रधान मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाणा साधला.

तामिळनाडूमध्ये मे महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून राहुल गांधींच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. याचबरोबर राज्यातील राजकीयव वातावरण देखील हळूहळू तापायला सुरूवात झाली आहे. राहुल गांधी सध्या तामिळनाडू दौऱ्यावर असून, विविध ठिकाणी रोड शो व सभांद्वारे ते भाजपावर जोरदार टीका करताना दिसत आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: