‘माझी चेष्टा महागात पडणार’ म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांबाबत संजय राऊतांनी केलं हे ट्विट

 

सेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर कोल्हापूर मध्ये पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटील यांना म्हटलं, काळ तुम्हाला दाखवून देतील तुम्ही कुणाची खिल्ली उडवता. तसेच माझी चेष्टा करणं महागात पडेल असंही म्हटलं. त्यावर आता संजय राऊत यांनी ट्विट करुन चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

महाग पडेल म्हणजे? Ed पकडून आणखी एक खोटे कांड करणार. बदनामी मोहीम राबवणार. मुलाबाळांना त्रास देणार. बरोबर? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबत जी भाषा तुम्ही वापरता. चेष्टा करता ते सहन करायचे ? शिवसेनेशी केलेली चेष्टा किती महाग पडलीय हा अनुभव आपण घेताय” असे ट्विट करून चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला राऊतांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले होते.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील? चंद्रकांत पाटील म्हणाले, माझी चेष्टा केली जाते राऊतांकडून… ही सर्व चेष्टा अंगावर येणार आहे. याचं कारण म्हणजे मी जे – जे म्हटलं ते खरं ठरत चाललं आहे. सामना वाचणं मी बंद केलं आणि संजय राऊत यांच्याबाबत मी बोलणं बंद केलं.

Team Global News Marathi: