मुस्लीम असल्याच्या संशयावरून भाजप नेत्याच्या मारहाणीत जैन वृद्धाची हत्या

 

मध्य प्रदेशातील सिरसाच्या वयोवृद्ध सरपंच पिस्ताबाई चत्तर यांचे ज्येष्ठ पुत्र भंवरलाल जैन यांचा भाजप नेत्याच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. मुस्लीम असल्याच्या संशयावरून त्यांना झालेल्या मारहाणीत त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. भाजप नेते दिनेश कुशवाहा यांनी वृद्धाला मारहाण केली. व्हिडिओत ते भंवरलाल यांच्याकडे आधार कार्ड दाखवण्याची मागणी करत त्यांना मारहाण करताना दिसून येत आहेत.

दिनेशने नाव व पत्ता विचारला तर मानसिकदृष्ट्या कमकुवत भंवरलाल यांच्या तोंडातून मोहम्मद निघाले. हे ऐकून दिनेश त्यांच्यावर तुटून पडला. त्याने आधार कार्डाची मागणी करत भंवरलाल यांना लाथाबुक्क्या मारल्या. दिनेश भाजप युवा मोर्चा व नगर विभागातील पदाधिकारी आहे. त्याची पत्नी मनासा नगर परिषदेत नगरसेविका म्हणून निवडून आली होती.

मृत भंवरलाल जैन हे रतलाम जिल्ह्यातील सरसी गावचे रहिवासी होते व १५ मे रोजी राजस्थानच्या चित्तोडगढमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर बेपत्ता झाले होते. शुक्रवारी सकाळी नीमच जिल्ह्यातील मनासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामपुरा रस्त्यावर त्यांचा मृतदेह आढळला. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, कुशवाहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे व घटनेची चौकशी सुरू आहे.

Team Global News Marathi: