महापालिका निवडणूक जिंकून दाखवा, राजकारण सोडेल; हजपला केजरीवाल यांचे आव्हान

 

नवी दिल्ली |पंजाब विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्ष दिल्ली महापालिकेवर झेंडा फडकावण्यासाठी सज्ज झाली आहे. तर दुसरीकडे दिल्ली महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यावरून अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे.

भाजपाला आव्हान देताना दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, ” भाजप स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवतो. पण त्यांना दिल्लीतील एका छोट्या पक्षाची भीती वाटते. तुम्ही दिल्लीच्या निवडणुकीला घाबरलात, तुमच्यात हिंमत नाही. हिंमत असेल तर निवडणुका वेळेत घ्या आणि जिंकून दाखवा. तुम्ही निवडणुका जिंकल्या तर, आम आदमी पक्ष राजकारण सोडेल असे आव्हान केजरीआवळ यांनी दिले आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, निवडणुका टाळता येऊ शकतात? पराभवाच्या भितीनं भाजप निवडणुका पुढे ढकलत आहेत. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हात जोडून विनंती आहे की, उद्या भाजप असेल किंवा नाही, आम आदमी पक्ष असेल किंवा नाही. मोदीजी असतील किंवा नाही. केजरीवाल असतील किंवा नाही. परंतु, देश वाचलं पाहिजे. दिल्ली महापालिकेची निवडणूक पुढे ढकलणं हा इंग्रजांना देशातून हाकलून देशात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान आहे असे सुद्धा केजरीवाल्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: