पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार फोडणार २९ ठिकाणी उद्घाटनांचा नारळ

 

पुणे | सध्या महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीला राजकीय पक्षांनी उडवत केली असून ओबीसी आरक्षणामुळे तूर्तास दोन-तीन महिने निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र, हा वेळ राजकीय तयारीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. हेच लक्षात ठेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी १३ मार्च रोजी पुण्यात उद्घाटन कार्यक्रमांचा धडाका लावणार आहेत. त्यांच्या हस्ते एक, दोन, तीन नव्हे तर चक्क २९ ठिकाणी उद्घाटनांचा नारळ फुटणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या विविध कामांचे लोकार्पण अजित दादांच्या हस्ते होणार आहे. अगदी सकाळी सातपासून या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे या दिवशी अजितदादा काय बोलणार याकडे आत्तापासूनच लक्ष लागले आहे. सध्या येणाऱ्या काळात राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या अतिशय महत्त्वाच्या महापालिकांची निवडणूक होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे रविवारी पुण्यात कार्यक्रम आहेतच. सोबत भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्याही हस्ते विविध कामांचे उद्घाटन होणार आहे. फडणवीस यांच्या हस्ते पाच ते सहा कार्यक्रमांचे उद्घाटन होणार असल्याचे समजते. हे दोन्ही दिग्गज एकाच दिवशी पुण्यात असल्यामुळे काय बोलतात हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: