भगवंत मान आज राज्यपालांकडे करणार सरकार स्थापनेचा दावा करणार !

 

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने जोरदार कामगिरी करत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यानंतर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी भगवंत मान यांची निवड करण्यात आली आहे. अशातच आज भगवंत मान हे राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.

शुक्रवारी आपच्या प्रमुख नेत्यांच्या झालेल्या बैठकीत ‘आप’च्या नवनिर्वाचित आमदारांनी मान यांची विधीमंडळ नेता म्हणून निवड केली होती. मान हे येत्या 16 मार्चला नवांशहर जिल्ह्यातील शहीद भगतसिंग यांचे मूळ गाव असलेल्या खटकर कलान येथे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तशी त्यांनी घोषणा देखील केली आहे.

निकालानंतर, शुक्रवारी मोहालीत झालेल्या आप आमदारांच्या बैठकीत भगवंत मान यांची आप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. शनिवारी ते सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. यावेळी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भगवंत मान यांनी निवडून आलेल्या आमदारांना सांगितले की, कोणीही अहंकार बाळगू नका. ज्यांनी आपल्याला मतदान केले नाही त्यांचाही आदर केला पाहिजे.

Team Global News Marathi: