मुंडे, देशमुख यांना राष्ट्रवादीकडून अभय मात्र राठोड यांच्यावर कारवाई का? शिवसेनेत जोरदार चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री  मुंडे यांच्यावर बलात्कारच आरोप तर अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा आरोप होऊन सुद्धा त्यांना राष्ट्रवादीकडून अभय देण्यात आला होता. मात्र संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना राजीनामा देण्यास भाग पडले होते. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये तसेच आमदारांमध्ये आता उघड नाराजी व्यक्त होत आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप लावले होते. पुढे ही तक्रार मागे घेण्यात आली होती. मात्र या सर्व घडामोडीत मंत्री मुंडे यांचे दुसरे लग्न आणि त्यांच्यापासून झालेली अपत्य हे प्रकार समोर आले होते. त्यामुळे नैतिकतेच्या दृष्टिकोनातून मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा होता अथवा पक्षाकडून त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता, अशी विरोधकांची मागणी होती.

मात्र, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवातीला हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले असले तरी नंतर सोयीस्करपणे आपल्या मंत्र्यांना वाचवले होते. तसेच पोलिस आयुक्तपदावरून दूर हटविण्यात आलेले आयपीएस अधिकारी परमबीरसिंह यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरच बार, पब, हॉटेल यांच्याकडून १०० कोटी रुपयांचा निधी जमविण्याबाबतचा आरोप केला होता. मात्र, त्यानंतरही देशमुख यांचा राजीनामा न घेता त्यांना अभय देण्यात आले आहे. विशेष म्हणजे देशमुख यांच्या बचावासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची फौजही मैदानात उतरली होती.

‘राष्ट्रवादी’च्या मंत्र्यांना अभय मिळत असताना राठोड यांचा ज्या प्रकारे राजीनामा स्वीकारण्यात आला त्यावरून आता शिवसेनेमध्येही उघड नाराजी व्यक्त होत आहे. कोणत्याही महिलेवरील अत्याचार गंभीरच असून, संबंधितांवर कारवाई व्हायलाच पाहिजे. मात्र राठोड यांना एक न्याय आणि मुंडे यांच्यासाठी दुसरा न्याय देण्यात आला होता.

Team Global News Marathi: