केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश नसल्यानं मुंडे भगिनी नाराज? फडणवीस पत्रकारावर संतापले |

 

 

मुंबई | कॅबिनेट मंत्री मंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातून चार खासदारांना संधी देण्यात आलेली आहे.

तब्बल ४३ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या नावांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होती. यात गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत होतं होती. तसेच त्या दिल्लीला रवाना झाल्याचे बोलले जात होते,

 

मात्र प्रीतम मुंडे दिल्लीत असल्याच्या बातम्यांना पंकजा मुंडे यांनी खोटं असल्याचं सांगत आम्ही मुंबईच्या निवासस्थानी आहोत असं म्हटलं होतं. त्यानंतर प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद नाही त्यामुळे मुंडे समर्थक नाराज झाल्याचं बोललं जात होतं. सोशल मीडियावर मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी आता वेगळा मार्ग निवडावा लागेल असं म्हटलं होतं.

 

या सर्व घडामोडींवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. नाशिकमध्ये पत्रकारांनी प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने दोन्ही भगिनी नाराज आहेत अशी चर्चा आहे असा प्रश्न विचारला होता. त्यावर तुम्हाला कुणी सांगितले? असा प्रतिसवाल देवेंद्र फडणवीसांनी केला.

 

फडणवीस म्हणाले की, मुंडे भगिनी नाराज असल्याचं तुम्हाला कुणी सांगितले? उगाच काहीही बदनामी करू नका. भाजपामध्ये सर्व निर्णय सर्वोच्च नेते घेतात. योग्यवेळी निर्णय होत असतो. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचं सांगून त्यांची अकारण बदनामी करू नका. राज्यातील ४ लोकांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्यांना चांगली खातीही देण्यात आली आहे. या खात्यांचा महाराष्ट्रासाठी चांगला फायदा होईल असा विधान त्यांनी केलं आहे.

Team Global News Marathi: