“युती अन् आघाडीची चिंता करू नका, शिवसेना बळकट करा”; उद्धव ठाकरेंचे सर्व जिल्हाप्रमुखांना आदेश

 

मुंबई | आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भारतीय जनता पक्षासोबत जुळवून घेण्याचा सल्ला दिला होता. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून सावध राहण्याचाही सल्ला दिला होता. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा यांच्या युती संदर्भात चर्चेला उधाण आले होते.

 

त्यातच आज शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची संवाद सोडून शविसेना अधिक मजबूत करण्याचे आदेश दिले आहे. राज्यातील शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांची आज बैठक पार पडली. खासदार अनिल देसाई या बैठकीला उपस्थित होते तर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला.

या बैठकीनंतर खासदार अनिल देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की, कोरोनामुक्तीसाठी प्रत्येक गावात काम करा. माझं गाव कोरोनामुक्त गाव अशी मोहिम राबवा. गावागावांत शिवसंपर्क अभियान सुरू करा. जनतेची काम करा. पक्ष बळकट करा. विधानसभानिहाय, तालुकानिहाय, पंचायतनिहाय पूर्वतयारी आहे. १२ जुलै ते २४ जुलैपर्यंत शिवसंपर्क अभियान राबवण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

Team Global News Marathi: