Tuesday, May 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईत उडत्या कंदीलांचा वापर आणि विक्री करण्यावर 30 दिवस बंदी

by Team Global News Marathi
October 13, 2022
in राजकारण
0
मुंबईत उडत्या कंदीलांचा वापर आणि विक्री करण्यावर 30 दिवस बंदी

 

16 ऑक्टोबर 2022 ते 14 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुंबईत कंदील (lanterns) उडवण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.तसेच चायनीज फ्लाइंग कंदीलांच्या वापर, विक्री आणि साठवणुकीवर देखील 14 नोव्हेंबरपर्यंत बंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईचे डीसीपी (ऑपरेशन) संजय लाटकर यांनी हे आदेश जारी केले आहेत. आकाशात कंदील उडवल्यानं मानवी जीवन आणि सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे.

येत्या 16 ऑक्टोबरपासून मुंबईत उडत्या कंदीलांचा वापर आणि विक्री 30 दिवसांसाठी प्रतिबंधित असणार आहे. चायनीज कंदील म्हणून समजल्या जाणाऱ्या फ्लाइंग कंदीलांचा वापर, विक्री आणि साठवणुकीवर 14 नोव्हेंबरपर्यंत बंदी लागू असेल. या आदेशाचे पालन न केल्यास मुंबई पोलीस त्याच्यावर भादंवि कलम 188 अन्वये कारवाई करणार आहेत. यासोबतच मुंबई पोलिसांनी शहरात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी देखील घातली आहे.

मुंबईतील शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांना वेगवेगळ्या स्त्रोतांकडून मिळाली आहे. याशिवाय मानवी जीवित आणि मालमत्तेचं नुकसानही होऊ शकतं. त्यामुळं मुंबईत दंगल घडू नये आणि सार्वजनिक वित्तहानी किंवा जीवितहानी होऊ नये, यासाठी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांचा हा आदेश 16 ऑक्टोबर 2022 ते 30 ऑक्टोबर 2022 पर्यंत लागू राहणार आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
स्टार-स्पोर्टस वाहिनी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेने पुकारलेल्या आंदोलविरोधात पोलिसांनी बजावल्या नोटीसा

स्टार-स्पोर्टस वाहिनी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेने पुकारलेल्या आंदोलविरोधात पोलिसांनी बजावल्या नोटीसा

Recent Posts

  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group