मुंबईत विनातिकीट प्रवाशांकडून रेल्वेने 80 कोटी वसूल केले

 

मुंबई | पश्चिम रेल्वेने विनातिकीट तसेच बेकायदेशीरपणे सामानाची वाहतूक करणाऱया प्रवाशांविरोधात राबविलेल्या मोहिमेत एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान 13.67 लाख केसेस दाखल करीत 80 कोटी रूपयांचा दंड वसुल केला आहे. पश्चिम रेल्वे विनातिकीट प्रवास करणाऱया विरोधात सातत्याने मोहिम राबवित असते.

या मोहिमेत एप्रिल ते जानेवारी या नऊ महिन्यात अनधिकृतपणे प्रवास करणाऱयांविरोधात रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने तिकीट तपासणी पथकाने 80.07 कोटी रूपयांचा दंड म्हणून रेल्वेच्या तिजोरीत जमा झाला आहे. या कारवाईत आरक्षित रेल्वे तिकीटांचे बेकायदेशीर हस्तांतरांचे नऊ गुन्हे दाखल करीत 13 हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

या मेहिमेत 540 भिक्षेकरी, 613 बेकायदेशीर फेरीवाल्यांना रेल्वेच्या हद्दीतून हुसकावण्यात आले असून तर 242 जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून 1,04,165 रूपयांचा दंड म्हणून वसुल करण्यात आला आहे. तसेच 17 एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान विनामास्क प्रवाशांवर केलेल्या कारवाईत 14,492 केसेस दाखल करीत 26.92 लाख रूपयांचा दंड वसुल केला आहे. लोकल तसेच स्थानकपरिसरात विनामास्क प्रवाशांवर पालिका आणि रेल्वेचे टीसी कारवाई करीत आहेत.

Team Global News Marathi: