मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षेच्या तारखा जाहीर

 

मुंबई | मुंबई विद्यापीठाने 2022 च्या प्रथम सत्राच्या उन्हाळी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या असून 19 एप्रिलपासून परीक्षा सुरु होत आहेत. यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाईन तर पारंपारिक कला, वाणिज्य, विज्ञान व स्वयं अर्थसहाय्यीत अभ्यासक्रमातील सत्र 6 च्या (चॉईस बेस ) नियमित व बॅकलॉगच्या परीक्षा या ऑनलाईन व प्रात्यक्षिक परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे.

सत्र 6 च्या परीक्षा या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या असतात, यानुसार या परीक्षांचा निकालही वेळेवर जाहीर करणे आवश्यक असते. यावर विद्यार्थ्यांचे पुढील उच्च शिक्षण तसेच नोकरी अवलंबून असते. या परीक्षेचे निकाल वेळेवर जाहीर करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या एकूण लसीकरणाची संख्या तसेच कोकणातील एस.टी. महामंडळाच्या संपाची परिस्थिती, कोविडची परिस्थिती, वसतिगृहातील विद्यार्थ्यांची कमी उपस्थिती तसेच मुंबई विद्यापीठाचा भौगोलिक विस्तार, महाविद्यालयाची संख्या व विद्यार्थी संख्या तसेच पदवी परीक्षेचे अनेक विद्यार्थी परदेशी शिकण्यासाठी बाहेर जात असतात.

तसेच पदवीचे निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी पारंपारिक कला, वाणिज्य, विज्ञान व स्वयं अर्थसहाय्यीत पदवी अभ्यासक्रमातील सत्र 6 च्या (चॉईस बेस ) नियमित व बॅकलॉगच्या परीक्षा या ऑनलाईन घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे. मात्र सत्र 6 च्या परीक्षेतील प्रात्यक्षिक परीक्षा मात्र ऑफलाईन घेण्यात येणार आहेत.

Team Global News Marathi: