मुंबई ते अलिबाग रो-रो सेवा पुनः सुरु होणार …! वाचा सविस्तर-

मुंबई ते अलिबाग रो-रो सेवा सुरु…!
          
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना राज्य शासनाने आनंदाची बातमी दिलेली आहे.  गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांची एकूण संख्या पाहता एसटीसह रेल्वेने सुद्धा खास गाड्या सोडलेल्या आहेत. त्यामागेमागच आता अलिबाग, मांडवा भागात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी  समुद्रमार्गे अलिबागपर्यंतच्या प्रवासाचा मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.


                 
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यपासून ही सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे लॉकडाउनचा मोठ्या प्रमाणात फटका या सेवेला बसलेला होता. मात्र कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे पुन्हा एकदा रो-रो सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
              
२० ऑगस्टपासून मुंबई ते अलिबागदरम्यान रो रो फेरी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी १० दिवसांसाठीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. भाऊचा धक्का ते मांडवा अशा मार्गावर ही रो रो सेवा सुरु होणार आहे. ज्याचा फायदा गणेशोत्सव काळात अलिबागच्या दिशेनं जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना होणार आहे. या सेवेमुळं रस्ते मार्गानं तीन तासांच्या प्रवासाऐवजी  अलिबागपर्यंतच्या प्रवासाठी ४५ मिनिटे इतकाच वेळ लागणार आहे.

रो रो सेवेची काही वैशिष्ट्य

ग्रीसहून आलेल्या एम २ एम १(M2M1 Ship) हे जहाज १४  फेब्रुवारीला मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचलं होतं. या जहाजात १००० लोकांना चांगल्या हवामानामध्ये आणि ५०० लोकांना खराब हवामानात समुद्रमार्गे होणाऱ्या प्रवासासाठी सामावून घेण्याची क्षमता आहे. या जहाजात सर्व परिस्थितीमध्ये २०० कार सामावून घेण्याची क्षमता देखील आहे. इंधनाची बचत करुन वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी या सेवेची मदत होणार आहे. या जहाजातून प्रवासी त्यांच्या प्रवासासाठी तीन श्रेणीतून निवडू शकतात.

ग्लोबल न्युज नेटवर्क: