मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात पाच जणांचा मृत्यू

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर अपघाताच्या घटना काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. त्यातच सोमवारी झालेल्या अपघातात नवी मुंबई येथील पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर त्याच घरातील पाच जणांना या अपघातामध्ये गंभीर दुखापत झालेली आहे. या घटनेमुळे नवी मुंबईत हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर खालापूर टोलनजीक फुडमॉलजवळ मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. कंटेनर ट्रेलर, इनोव्हा कार, क्रेटा कार, टेम्पो, ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात पाचही गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

या अपघातामध्ये डॉक्टर वैभव झुंजारे यांची आई, पत्नी आणि ५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. डाॅ. वैभव झुंजारे नवी मुंबई महानगरपालिकेत पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. जखमींपैकी दोघांना पनवेल, दोघांना वाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त दोन कारमधील कुटुंबीय एकत्र पुण्याला एका कार्यक्रमाला गेलो होते. पुण्याहून परतत असताना हा अपघात झाला. एका कंटेनरने मागच्या बाजून टेम्पोला धडक दिली. या धडकेमुळे टेम्पो पलटी झाला आणि मागून येणाऱ्या या दोन कार टेम्पोला धडकल्या. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने या दोन्ही गाड्यांनी धडक दिल्याने अपघाताची भीषणता वाढली.

Team Global News Marathi: