कोरोना संसर्ग वाढल्याने पुण्यात खासगी रुग्णालयात 50 टक्के बेड्स आरक्षित

पुणे : काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर रुग्णांचा वाढता आलेख लक्षात घेऊन येथील प्रशासनाने सावध पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

पुणे शहरात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांतील 50 टक्के रुग्णालये आरक्षित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकार तसेच प्रसासन अलर्ट झाले आहे. पुण्यात तर कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

त्यामुळे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पुण्याच्या महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी पुणे शहरातील 50 टक्के रुग्णालय आरक्षित ठेवण्याचे निर्देश दिलेयत.

नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे पुण्यात पुढील सहा महिने कोव्हिड रुग्णांसाठी सर्व खासगी रुग्णालयांत जनरल वार्ड तसेच आयसीयूमध्ये 50 टक्के बेड आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: