मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. ली. कंपनी आहे काय? – आशिष शेलार

सध्या भृहमुंबई महानगर पालिका निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना मुंबईची सत्ता काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या नेतेमंडळींना मैदानात उतरविले आहे. त्यातच आता मुंबई मनपात होत असलेल्या गैरव्यवहाराचा आरोप करत स्थानी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचे नाव घेऊन भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे. या संदर्भात आशिष शेलार यांनी ट्विट केले आहे.

“६५० कोटी विकास निधीपैकी शिवसेना ९७ नगरसेवकांना २३० कोटी, भाजपा ८३ नगरसेवक ६० कोटी, काँग्रेस २९ नगरसेवक ८१ कोटी आणि हो स्थायी समिती अध्यक्षांना एकट्याला ३० कोटी… मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. ली. कंपनी आहे काय? हा दुजाभाव मुंबईकरांसोबत करताय लक्षात असू द्या!” असं म्हणत शेलार यांनी टीकास्त्र सोडले आहे.

उत्पन्नात मोठी घट असताना कोरोना काळात 1600 कोटी रुपये खर्च झाल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. मात्र यावेळेस अंतर्गत निधीतून कर्ज उचलणेही शक्य नसल्यामुळे आता शेअर बाजारातून कर्जरोख्यातून पैसे उभे करण्याचा पालिका प्रशासनाचा विचार सुरू आहे.

Team Global News Marathi: