राज ठाकरे जेव्हा पत्रकारांना सांगतात “मी मास्क घालत नाही, तुम्हालाही सांगतोय…”

मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं शनिवारी मुंबईकतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख प्रमुख राज ठाकरे हेदेखील आपल्या पत्नीसह उपस्थित होते.

यावेळी राज ठाकरे यांनी मास्क परिधान केले नव्हंत. यावरून त्यांना पत्रकारांनी तुम्ही मास्क परिधान केला नाही असा सवाल केला. यावर उत्तर देताना मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय असं म्हणत त्यांनी पत्रकाराला उत्तर दिलं.

सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. अशातच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता. तसंच नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहनही केलं होतं. मात्र राज ठाकरे यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

Team Global News Marathi: