अबब भारतात सुरु होणार गाढवीणीच्या दुधाची डेअरी, प्रति लिटर असणार ६००० रुपयेचा भाव….!

अबब भारतात सुरु होणार गाढवीणीच्या दुधाची डेअरी, प्रति लिटर असणार ६००० रुपयेचा भाव….!

भारत हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतीबरोबर दूध व्यवसाय, शेळी पालन , कुकुट पालन असे इतर व्यवसाय जोडधंदा म्हणून शेतकरी करत असतो. आज पर्यंत भारतात गाय, म्हैस यांच्या दुधाच्या डेअऱ्या आपण पाहिलेल्या आहेत मात्र आता चक्क गाढवीणीच्या दुधाची डेअरी नवी दिल्ली येथे सुरु करण्यात येणार आहे.

आज पर्यंत आपण गाढवावरून अनेक हास्यास्पद म्हणी आपण ऐकलेल्या आहेत.मात्र आता गाढवीणीच्या दुधाचा शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोग होणार आहे. यासाठी हिसारमध्ये गाढविणीच्या दुधाची डेअरी सुरु होणार आहे. या दूध देणाऱ्या गाढवीणीची प्रजाती गुजरात मध्ये आढळून येते.

एनआरसीई हिसारमध्ये हलारी जातीच्या गाढविणीच्या दुधाची डेअरी सुरु होतेय. यासाठी एनआरसीइने १० हलारी जातीच्या गाढविणी मागितल्या आहेत. गाढवाची ही प्रजात गुजरातमध्ये आढळते. औषधी क्षेत्रासाठी हे दूध म्हणजे वरदान मानले जाते. मात्र या दुधाची किंमत प्रति लिटर ६ हजार इतकी असू शकते.

गाढविणीचे दूध शक्तीदायक, स्थिरता आणणारे, उष्ण, किंचित आंबट व खारट असून रुक्ष आहे. त्यात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी असते. सर्व प्रकारचे वातविकार, अर्धांगवात, पक्षाघात (हातपायावरून वारे जाणे) हे रोग या दुधाने बरे होतात.

गाढविणीच्या दुधामध्ये व्हिटॅमिन बी, बी-12 यांची मात्रा; तसेच उष्मांक जास्त आहेत. आईच्या दुधापेक्षा गाढविणीच्या दुधामध्ये 60 पटींनी जास्त व्हिटॅमिन सी आहे.

एक वर्षांच्या आतील बालकाला हे दुध अमृत आहे. हे दुध श्वसनविकारावर जालीम औषध समजले जाते. सर्दीच्या आजारात लहान मुलांची छाती भरल्याने श्वसनास त्रास होतो. हा त्रास गाढविणीचे दूध दिल्यानंतर तत्काळ कमी होत असल्याचे सांगण्यात येते.

गाढविणीचे दूध विषबाधेवर, तापासाठी, झटके येत असतील तर, डोळ्यांच्या रोगावर, दंतरोगावर, तसेच प्रजननसंबंधी रोगांवर गुणकारी असल्याचे नमूद केले आहे.

टीबी आणि मधुमेह अशा आजारांसाठी गाढविणीचे दुध घेण्याचा सल्ला दिला जातो. या दुधामध्ये शर्करेचे प्रमाण फार कमी असते त्यामुळे मधुमेह असलेली व्यक्त या दुधाचे सेवन करू शकते.

सौंदर्यप्रसाधन म्हणून हे दुध फार उपयुक्त आहे. गाढविणीच्या दूधामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होण्य़ास मदत होते. तसेच या दुधामुळे शरीराची कातडी ही मऊ, मुलायम व चमकदार होते असे वैद्यकाचे म्हणणे आहे.

इजिप्तची राणी सौंदर्यसम्राज्ञी क्लिओपात्रा गाढविणीच्या दुधात अंघोळ करत असल्याचे नमूद आहे. याकरता तिच्या पशुशाळेमध्ये सातशे गाढविणी सांभाळल्या होत्या. हेच आपल्या सौंदर्याचे रहस्य असल्याचे तिने सांगितले होते. (

मात्र ध्यानात असुद्या, गाढविण जास्त दुध देऊ शकत नाही, हे दुध साठवून ठेवणे शक्य नाही. त्यामुळे दुध काढल्या काढल्या घेणे गरजेचे असते. या दुधाला हवेचा संपर्क आल्यास दुधात जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो.

(सूचना : या लेखाचा उद्देश हा माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)

ग्लोबल न्युज नेटवर्क: