मुंबई मॉडेलवर हसणाऱ्यांना आयुक्त चहल यांचे सडेतोड उत्तर !

संपूर्ण राज्यभरात कोरोना रुग्णसंख्या झपाटयाने वाढताना आढळून आली होती. त्यात मुंबई मोठ्या संख्याने रुग्णसंख्या सुद्धा वाढताना दिसून आली होती. मात्र आता मुंबई शहरामध्ये राबवण्यात आलेल्या विविध योजनांमुळे कोरोनाला रोखण्यात यश मिळाले आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या या कामाचे कौतुक देखील केले होते. न्या. चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शाह यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान दिल्लीतील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात बोलताना मुंबई महापालिकेने कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामाचे कौतुक करण्यात आले आहे.

यावर आता आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी प्रतिक्रिया दिली आहे “सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मुंबई मॉडेलसारख्या इतर काही ठिकाणी सुविधा करता येऊ शकतात का हे तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरुन आमच्यावर हसवण्याचेच ठरवले असेल तर मुंबई मॉडेल आम्ही देशाला कसे समजवून सांगणार? अशी प्रतिक्रिया आयुक्त चहल यांनी देत हसणाऱ्यांना जोरदार टोला लगावला आहे.

ते म्हणाले की, भारतीय प्रशासनात काम करणारे मित्र दोन महिन्यांपूर्वी मला फोन करुन फक्त महाराष्ट्रातच कोरोना आहे का, असे प्रश्न विचारत हसत होते. जर एखादी व्यक्ती आपल्यावर हसत असेल तर माझी काम करण्याच्या मॉडेलबाबत मी त्यांना कसे सांगेन? जेव्हा आपत्ती येते तेव्हा शिकण्याची वेळ नसते, तेव्हा त्या मॉडेल्सप्रमाणे काम करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नसल्याचेही आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दि इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे.

Team Global News Marathi: