मुंबई मनपाची आरक्षण सोडत निघतानाच शिवसेना इच्छुकांची चढाओढ सुरु

 

मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. आरक्षण सोडतीनंतर गेली अनेक वर्ष निवडणुकीची वाट पाहत असलेले शिवसेना नेते,इच्छुक उमेदवार, माजी नगरसेवक सज्ज झाले आहेत. कार्यक्रमाचा धडाका, वरिष्ठ नेत्यांसोबत लॉबिंग आणि वॉर्डांवर आपला असलेला हक्क दाखवण्याची चढाओढ देखील सुरु झाल्याचे चित्र आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या प्रभाग सोडतीने सर्वच राजकीय पक्षातील प्रस्थापित दिग्गज माजी नगरसेवकांना गारद केले आहे.त्यात शिवसेनेच्या ही काही नगरसेवकांना आणि इच्छुकांना झटका बसला आहे.त्यामुळे आता त्यांना नव्याने प्रभाग शोधताना स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात नाराजी उफाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभाग सोडतीचा फटका बसलेल्या माजी नगरसेवकांची सोय लावताना राजकीय पक्षांची दमछाक होवू शकते.

236 प्रभागांमध्ये 50 टक्के म्हणजे 118 प्रभागांमध्ये महिला आरक्षण लागू झाले आहे. या आरक्षणाने प्रभागांची उलथापालथ झाली असून शिवसेना माजी नगरसेवक आणि इच्छुकांना नव्याने मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे चित्र सध्या मुंबईत पाहायला मिळते अनेक कार्यक्रम इच्छुक अन तर्फे घेतले जात आहेत तसेच आपल्या विभागातील मोठ्या नेत्यांना बोलावून आपल्या पदरी नगरसेवक तिकीट कशी मिळेल यासाठी प्रयत्न होत असल्याचे चित्र सध्या आहे.

आशिष चेंबुरकर, समाधान सरवणकर, अमेय घोले, अनिल पाटणकर आदींना प्रभाग आरक्षणामुळे प्रभागाला मुकावे लागले आहे. त्यामुळे त्यांना आता पर्याय शोधावा लागणार आहे. दुसऱ्या प्रभागाचा अभ्यास करायला या मंडळींनी सुरुवात केली याची देखील माहिती समोर येत आहे. आरक्षण सोडतीमुळे शिवसेनेतील अनेक माजी नगरसेवक आणि इच्छुकांच्या इच्छा अपेक्षांवर पाणी सांडलं आहे. प्रभागात आरक्षण पडल्यानं आता इच्छुक आणि माजी नगरसेवक मंडळी पक्षांतर्गत लॉबिंग करण्यासाठी सरसावली आहेत.

Team Global News Marathi: