मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकतर्फी विजय

 

मुंबई | मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. त्यांनी २९-२ने धनंजय शिंदे यांचा पराभव केला. एकूण ३४ जणांपैकी २९ मतदारांनी निवडणुकीसाठी मतदान केले. मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वाद होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या निवडणुकीत एकूण ३४ जणांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. त्यापैकी ३१ मतदारांनी मतदान केले. यामध्ये फक्त दोन मते शिंदे यांना मिळाली. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या निवडणुकीवेळी पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. मात्र, ही साखर कारखाने किंवा बँकेची निवडणूक नाही. सरस्वतीच्या संस्थेमध्ये गैरप्रकार सुरू असून, याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशारा धनंजय शिंदे यांनी दिला आहे.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय कार्यकारिणी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या निवडणुकीत सात उपाध्यक्ष निवडले गेले आहेत. त्यामध्ये मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ भालचंद्र मुणगेकर, माजी आमदार विद्या चव्हाण, नामवंत वास्तुविशारद शशी प्रभू, निवृत्त न्यायाधीश अरविंद सावंत, प्रदीप कर्णिक, जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, अमला नेवाळकर यांचा समावेश आहे.

Team Global News Marathi: