किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर मुंबई मनपाचे पुराव्यानिशी उत्तर !

मुंबई : मुंबई महानगरपालिकेवर रेमडेसीवीर इंजेक्शन खरेदी गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. या संदर्भत सोमय्या यांनी ट्विट करून गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. आता सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना बृहमुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी पुराव्यानिशी सडेतोड उत्तर दिले आहे.

महानगरपालिकेवर रेमडेसीवीर इंजेक्शन जास्त दरात खरेदी केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. रेमेडेसेवीर जास्त दरात मुंबई महापालिकेने खरेदी केल्या या आरोपावर पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी खुलासा केला आहे. जरी कमी पैशात इंजेक्शन घेण्याची प्रक्रिया हॉपकिन्स इन्स्टिट्यूटने केली असेल तरी त्यांना अजूनही इंजेक्शन उपलब्ध झालेली नाही.

तसेच मुंबई महापालिका प्रमाणे सुरत, सातारा, मध्यप्रदेश इथल्या महानगर पालिकेने सुद्धा मुंबई महापालिकेने घेतलेल्या किमतीमध्ये इंजेक्शन विकत घेतल्याचा खुलासा चहल यांनी केला आहे. त्याचबरोबर केवळ मुंबईलाच नाही तर सर्वांना त्याच दरात मायलान या कंपनीने इंजेक्शन दिले आहे. तब्बल 2 लाख कुप्प्या मुंबई महापालिकेने मागवलेल्या आहेत, त्यापैकी 60 हजार उपलब्ध झाल्या आहेत आणि उर्वरित येत्या काळात मिळणार असल्याची माहितीही चहल यांनी दिली.

Team Global News Marathi: