मुंबई मनपाचा निर्णय, होम क्वारंटाईन असणाऱ्यांवर पुन्हा मारले जाणार शिक्के

मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या घटत असलताना पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळं राज्य सरकार आणि मुंबई मनपाची डोकेदुखी वाढली आहे. त्यात नागरिकांनी कोरोनाचे नियम न पाळल्यास कठोर पाऊले उचलावी लागतील असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी काहीच दिवसांपूर्वी दिला होता.

यानुसार एका इमारतीत आता पाच पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले तर ती संपूर्ण इमारतच सील केली जाणार आहे. तसेच मुंबईतील अधिक गर्दीची ठिकाणांवर पालिकेची नजर असेल. कोरोनाविषयक नियमांची पायमल्ली करणाऱ्या हॉटेल, मंगल कार्यालयांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी महानगरपालिकेचे सर्व अतिरिक्‍त आयुक्‍त, परिमंडळीय सहआयुक्‍त, उपआयुक्‍त, सर्व विभाग कार्यालयांचे सहायक आयुक्‍त तसेच संबंधित अधिकारी यांच्‍यासमवेत व्हिडिओ कॉन्‍फरन्‍सद्वारे बैठक घेतली. आयुक्‍त चहल यांनी त्‍यावेळी परिस्थितीचा आढावा घेऊन यंत्रणेला आवश्‍यक ते निर्देश दिले.

तसेच लक्षणे आढळत नसलेल्‍या बाधित (असिम्‍प्‍टोमॅटिक) रुग्‍णांना घरी विलगीकरण (होम क्‍वारंटाईन) करण्‍यात येणार आहे. अशा रुग्‍णांवर पूर्वीप्रमाणे हातावर शिक्‍के मारण्‍यात यावेत. तसेच त्‍यांची माहिती संबंधित सोसायटींना कळवावी. वॉर्ड वॉर रुम्‍सच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍यावर बारकाईने नजर ठेवावी. अशा व्‍यक्तिंना दिवसातून ५ ते ६ वेळा दूरध्‍वनीवर संपर्क साधून ते घरी असल्‍याची खातरजमा करावी असे नवी नियमावली लागू करण्यात आलेली आहे.

Team Global News Marathi: