राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांना कोरोनाची लागलं

साध्या राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात कालच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. या संदर्भातील माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली होती, आता त्या पाठोपाठ धडाडीचे नेते म्हणून ओळख असलेल्या बच्चू कडू यांना दुसऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

माझी कोरोना चाचणी दुसर्‍यांदा पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी. असे ट्विट मंत्री बच्चू कडू यांनी केले आहे.

मागच्या सात ते आठ दिवसात गृहमंत्री अनिल देशमुख, राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, मंत्री जयंत पाटील, मंत्री राजेश शिंगणे तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झल्याचे समोर आले होते. त्यापैकी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरोनावर मात केली होती.

Team Global News Marathi: