मुंबई : लता मंगेशकर यांच्या इमारतीत कोरोनाचा शिरकाव
गायन सम्राज्ञी लता मंगेश राहत असलेल्या मुंबई मधील प्रभुकुंज सोसायटीत कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे संपूर्ण इमारत सील करण्यात आलेली आहे. या इमारतीमध्ये वयोवृद्ध मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मनपा आरोग्य विभागाकडून सदर इमारत सील करण्यात आलेली आहे.
सध्या राज्यातील इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचा शिरकाव होताना दिसून येत आहे. त्यातच मुंबईत काही प्रमाणात कोरोना आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र काल पेडर रोड येथे असलेल्या मंगेशकर
कुटुंबीय राहत असलेल्या इमारतीमध्ये एका वयोवृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत सॅनिटायझर करून सील करण्यात आलेली आहे.
३० सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊन वाढवला ; प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही; वाचा अनलॉक ४ ची नियमावली
या बातमीनंतर संपूर्ण देशभरातून मंगेशकर कुटुंबियांच्या तब्ब्येतीसाठी फोन येऊ लागल्यामुळे स्वतः कुटुंबीयांनी पत्रक काढून त्याबाबतची माहिती दिलेली आहे. “करोनाचा प्रकोप पाहता आमच्या सोसायटीत साधेपणानेच गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आमच्या कुटुंबातील सर्वांची प्रकृती उत्तम आहे. त्यामुळे कुटुंबीयांबाबत कृपया कोणीही अफवा पसरवू नका” असे त्यांनी पत्रकात म्हंटले आहे.
सासऱ्याचा अचानक मृत्यू अनं घरातील सर्वाना झाला कोरोना: ‘तिने’ केली आत्महत्या