मुंबईतील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत चढउतार सुरूच

 

मुंबई | मागच्या मार्च महीन्यापासून कोरोनाच्या संसर्गाने मुंबईकरांची झोपच उडवली होती तसेच अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले होते असंच चित्र पाहायला मिळालं होतं. मात्र अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचं दिसून येत आहे. त्यातच आता मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचं दिसत आहे.

मुंबईत रविवारी दिवसभरात २१७ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात २४७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या हळूहळू कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच आज दिवसभरात ४ जणांनी प्राण गमावला आहे. मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ७,६२,६१६ एवढी आहे. तर मुंबईत सध्या २२१८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण १६,३३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. मात्र आता संख्येमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यायला हवी, असं महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

Team Global News Marathi: