शिवसेना आमदारांच्या इशाऱ्यावरून वाझे सेटिंगने करायचा पोलिसांच्या बदल्या ईडीचा आरोप

 

मुंबई | महाराष्ट्रात पोलिसांच्या बदल्या, बढतीमध्ये झालेल्या वसुली प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ईडीने महाराष्ट्रातील एक कॅबिनेट मंत्री अतिरिक्त पोलिस आयुक्त (एसीपी) अथवा त्यावरील रँकच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्याची यादी बदली किंवा पदोन्नतीच्या हेतुने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठवित होते, असा दावा केला आहे. ही नावे शिवसेना आमदाराच्या शिफारसींवर होत असल्याचे ईडीने म्हंटले आहे.

ईडीने ही माहिती कोर्टाला देशमुख यांचा खासगी सचिव पलांडेने दिलेल्या जबाबवर दिली आहे. पलांडे एक अतिरिक्त जिल्हाधिकारी रँकचा अधिकारी आहे, ते ही अनधिकृतयादी पोलिस स्थापना बोर्डकडे पाठवित होते. आणि हा सर्व प्रकार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निर्देशावरूनच केला जात होता, असा युक्तिवादही ईडीने केला.

पलांडेद्वारा मनी लाँड्रिंगविरोधात दाखल गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी केलेल्या याचिकेला विरोध करतेवेळी ईडीने एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रात एक मंत्री तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांना बदली व पदोन्नतीची एक यादी घेऊन नेहमीच भेटत असत. या यादीत पोलिस अधिकारी व त्याची कुठे बदली करावी याबाबतचे नाव असायचे. ही यादी शिफारस करणाऱ्या शिवसेना आमदार अथवा विधान परिषदेच्या आमदाराची असायची असेही प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

पलांडे मुंबईचा निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझे व देशमुख यांच्यात ‘सेटिंग’ करण्यासाठी महत्त्वाची भूमिका वठवित होता, असेही ईडीने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. या बैठकांमध्ये मुंबईतील बार व ऑर्केस्ट्राद्वारे वसुली वाढविण्यावरही चर्चा होत होती. पलांडेला ईडीने याच वर्षी जून महिन्यात अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

Team Global News Marathi: