मुंबईत सर्व कोरोना सेंटर पुन्हा सुरु करण्यात येणार, मुंबई मनपाचा निर्णय

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपला डोकं वर काढलं आहे. आज मुंबईत झपाट्याने वाढ होत आलेली रुग्णसंख्या राज्य सरकार आणि मुंबई मनपाच्या चिंतेत अधिक भर घालणारी आहे. राज्यात ६ हजाराच्यावर कोरोना रुग्णसंख्या पोहचली आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम कठोर करण्यात आले आहेत.

त्यात आता मुंबईतील सर्व कोरोना सेंटर पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. मुंबईत वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई मनपाने हा निर्णय घेतलेला आहे. तसेच पालिका आयुक्तांनी आठवड्याभरात ही सर्व सेंटर सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोना केंद्रांत ७० हजार ५१८ खाटा उपलब्ध आहेत. यांपैकी सध्या १३ हजार १३६ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत; तर ९७५७ खाटा राखीव आहेत. डिसेंबर महिन्यात कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर बहुतांशी कोविड सेंटर बंद करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुर्वरत सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Team Global News Marathi: