कोरोना लसीकरणासाठी सरकार घेणार खाजगी क्षेत्राची मदत

राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. एकीकडे वैद्यकीय कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरु असताना दुसरीकडे मात्र पुन्हा एकदा कोरोना रुग्णाची संख्या वाढताना दिसत आहे. याच पाश्वभूमीवर आता केंद्र सरकारे महत्वाचा निर्णय घेतला आहे.

खासगी दवाखाने आणि त्याचबरोबर खासगी क्षेत्राकडून थेट लसीकरण सुरू करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वसामान्यांसाठी लसीकरण खुले केले जावे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून पुढे येत होती.

आज या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिवांसमवेत पुण्यातील काही उद्योजकांची बैठक झाली. यावेळी चाचण्यांची क्षमता वाढवणे, टेस्टिंग वाढवणे याबरोबरच एन आय व्ही वरचे अवलंबित्व कमी करणे अशा अनेक सूचना देण्यात आल्या. पेशंटची वेळेवर तपासणी न होणे गृह विलगीकरण आत असलेल्या पेशंटचा ट्रॅक्टर ठेवला जाणे तसेच कोरोना संदर्भात जे निर्बंध घालण्यात आले आहेत त्याच्या बाबतीत नागरिकांकडून होणारा निष्काळजीपणा अशा अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली होती.

Team Global News Marathi: