मुंबई :समाजवादी पक्षाच्या नगरसेवकाच्या मुलाच्या लग्नाला जमली चार-पाच हजाराची गर्दी

मुंबई :समाजवादी पक्षाच्या नगरसेवकाच्या मुलाच्या लग्नाला जमली चार-पाच हजाराची गर्दी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून काही निर्बंध लादण्यात आले होते. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी काही निर्बंध लादण्यात आले होते. मात्र हे नियम पायदळी तुडवत हजारो लोकांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षाच्या नगरसेवकाच्या मुलाचे लग्न पार पडले होते. आता या लागणीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झालेली आहे.

 

यापैकी एका लग्न समारंभाचे यजमान समाजवादी पक्षाचे नगरसेवक अख्तर कु रेशी होते. कु रेशी यांचे चिरंजीव अनस याचे सोमवारी लग्न आणि बुधवारी ‘रिसेप्शन’पार पडले. संध्याकाळी सुरू झालेल्या या दोन्ही समारंभांना सुमारे चार ते पाच हजार वऱ्हाडी उपस्थित होते. त्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, समाजवादी पक्षाच्या अनेक मोठय़ा नेत्यांचाही समावेश आहे.

या दोन्ही समारंभांसाठी बाऊन्सर, भटारखान्यात जेवण तयार करणाऱ्यांचीच संख्या दोनशेच्या पुढे होती. एम पूर्व विभाग कार्यालयासमोरील रस्ता ओलांडताच हा मोकळा भूखंड सुरू होतो. सुरुवातीला वाहनतळ, त्यापुढे लांबलचक लग्न सभागृह, भोजन कक्ष आणि भटारखाना अशी व्यवस्था अख्तर यांनी करून घेतली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: