गावां-गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची धामधूम सुरु

गावां-गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची धामधून सुरु

निवडणुकीत आयोगाने राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वच पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहे. त्यात काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीला अधिक रंगत येणार आहे.

त्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. मात्र सरपंच आरक्षण सोडतीपासून ते अर्ज भरण्यापर्यंत गोंधळ सुरु असल्याचे दिसतंय. त्यातच नव्या जीआरमुळे गोंधळ आणि वाद वाढण्याची चिन्हं आहेत. कारण सदस्यांपासून ते सरपंचपदापर्यंत किमान सातवी पास ही अट ठेवण्यात आली आहे.

जो उमेदवार १९९५ नंतर जन्मलेला असेल, आणि ज्याला सदस्य किंवा सरपंच म्हणून नियुक्त करायचं असेल तर संबंधित उमेदवार सातवी पास असणे आवश्यक आहे. २४ डिसेंबरला हा जीआर जारी करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारने भाजप काळातील थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द करत, सदस्यातून सरपंच निवडीचा निर्णय घेतला. तसंच यावेळी सरपंच आरक्षण सोडत ही निवडणुकीपूर्वी न होता, ती निवडणुकीनंतर होणार आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: