मुंबईच्या २९ खाजगी रुग्णालयात मिळणार कोरोनाची लस, मुंबई मनपाची माहिती

मुंबई : राज्यात वैद्यकीय कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या कोरोनाची लस टोचण्याचे काम सुरु आहे. त्यात १ मार्च पासून ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांना आणि गंभीर आजारांच्या व्याधी असलेल्यांना कोविशील्ड लस टोचण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यात आता वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांसाठी खाजगी रुग्णालयात कोरोनाची लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना याबाबतचे निर्देश आहेत. यानुसार मुंबईतील २९ खासगी रुग्णालयात कोरोनाची लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आता सामान्य नागरिकांना सुद्धा कोरोनाची लस टोचून घेता येणार आहे. यासाठी त्यांच्याकडून २५० रुपये आकारण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार, सर्व खासगी रुग्णालयांना कोविड लस देण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुंबईतील २९ खासगी रुग्णालयात कोरोनाची लस उपलब्ध असणार आहे. नुकतंच मुंबई महापालिकेने याबाबची यादी जारी केली आहे. या यादीत रुग्णालयांची नावे देण्यात आली आहे.

मुंबईत ‘या’ रुग्णालयात मिळणार कोरोना लस

शुश्रुषा रुग्णालय, विक्रोळी, के. जे. सोमय्या रुग्णालय, डॉ. बालाभाई नानावटी रुग्णालय, वॉकहार्ट रुग्णालय, सर एच. एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय, सैफी रुग्णालय, पी. डी. हिंदुजा रुग्णालय, डॉ. एल. एच. हिराचंदानी रुग्णालय, कौशल्य मेडिकल फाऊंडेशन, मसीना रुग्णालय, हॉली फॅमिली रुग्णालय,एस. एल. रहेजा रुग्णालय, लिलावती रुग्णालय, गुरु नानक रुग्णालय, बॉम्बे रुग्णालय, ब्रीच कँडी रुग्णालय, फोर्टिस, मुलुंड, द भाटिया जनरल रुग्णालय, ग्लोबल रुग्णालय, सर्वोदय रुग्णालय, जसलोक रुग्णालय, करुणा रुग्णालय, एच. जे. दोषी घाटकोपर हिंदू सभा रुग्णालय,SRCC चिल्ड्रन्स रुग्णालय, कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय, कॉनवेस्ट अँड मंजुळा एस. बदानी जैन रुग्णालय, सुरुणा शेठिया रुग्णालय, हॉली स्पिरीट रुग्णालय, टाटा रुग्णालय

Team Global News Marathi: