पूजाच्या कुटुंबियांकडून माझी हत्या होण्याची शक्यता, पूजाच्या चुलत आजी शांताबाई यांचा आरोप

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण राज्यात चांगलेच गाजले होते. त्यात या प्रकरणात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्त केला होता. मात्र पूजाच्या वडिलांनी राठोड यांचे समर्थन केले होते.

या सर्व प्रकरणावर पूजाच्या चुलत आजी शांताबाई हिने पुजाच्या आई-वडिलांवर गंभीर आरोप लावले आहेत. पूजाच्या कुटुंबियांना हे प्रकरण दाबून ठेवण्यासाठी संजय राठोड याने ५ कोटी दिल्याचा दावा तिने केला होता. आता याच पार्श्वभूमीवर पूजाच्या कुटुंबियांकडून जीवाला धोका असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

माझं नातं हे रक्ताचे आहे, पैशामुळे माझी पूजाच्या कुटुंबाकडून हत्या होण्याची शक्यता असल्याचा गंभीर आरोप पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी केला. मात्र या आरोपानंतर पूजाचे वडील लहूदास चव्हाण यांनी शांताबाई राठोड यांच्या विरुद्ध परळी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. माझ्याविरुद्ध तक्रार देण्यात आली हे चुकीचे आहे. मी सत्यासाठी लढत आहे. मी पुण्यात जाऊन पूजाला न्याय मिळावा म्हणून तक्रार दिली म्हणून याची झळ पूजाच्या कुटुंबाला लागल्याची खंत शांताबाई यांनी व्यक्त केली आहे.

Team Global News Marathi: