मुंबई महापालिका निवडणुका शिवसेना जिंकणारच, उद्धव ठाकरेंना आत्मविश्वास

 

मुंबई | मुंबई महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माजी नगरसेवकांना दिले आहेत. मुंबईत आज त्यांनी माजी नगरसवेकांना मार्गदर्शन केले. मुंबई महापालिका निवडणुका शिवसेना जिंकणारच. असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. ही महापालिका निवडणूक तुमच्याच जीवावर जिंकणार, असे उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना सांगितले आहे.

तसेच लोकांसोबत काम करणे हा शिवसैनिकांचा गुणधर्म आहे, ही कामे करत राहा, वॉर्डामध्ये फिरा असा कानमंत्र उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना दिला आहे. जे कुणी गेले त्यांची आपल्याला पर्वा नाही, शिवसैनिक आपल्यासोबत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. जनतेची कामे करत राहा, सामाजिक बांधिलकी सोडू नका, असा सल्ला या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

कुणाच्याही अमिषाला बळी पडू नका, असा सल्लाही या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना दिला आहे. २०१७ ची वॉर्ड रचना ठेवण्याचा आदेश आता एकनाथ शिंदे सरकारने दिले आहेत. त्याला विरोध करत शिवसेना कोर्टात जाणार असल्याची माहिती आहे. नव्या वॉर्ड रचनेत पुन्हा एकदा आरक्षणे बदलण्याचीही शक्यता आहे.

या सगळ्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक लांबणीवर जाण्याचीही शक्यता आहे. अशा स्थितीत या नव्या निर्णयाला आव्हान देण्याचा शिवसेनेचा मानस आहे. पावसाळा अर्धा उलटला आहे, असा स्थितीत कोरोना, स्वाईन फ्ल्यू सारख्या आजारांची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा काळात मुंबईकरांच्या मदतीला धावून जा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

Team Global News Marathi: