‘२०१४ पर्यत गरिबी हटली नाही, सारे गरीब एकत्र झाले, अन् गरिबांचा प्रधान मंत्री झाला’

 

नाही | २०१४ पर्यंत देशात विकास कुठेच नव्हता. अनेक भागात नुसतीच गरिबी होती. मात्र त्यानंतर देशातील सर्व गरीब एकत्र आले अन देशात गरिबांचा पंतप्रधान झाला. तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबी हटाव चा नारा दिला. अन भारत सुजलाम सुफलाम झाल्याचे केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

दानवे हे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाप्रसंगी नाशिक मध्ये होते. त्यांनी भगूर येथील वीर सावरकर यांच्या सावरकर वाड्याला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले कि, तिरंगा झेंडा आपण फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला बघतो, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच घरांवर तिरंगा फडकला पाहिजे अशी संकल्पना मांडली आणि आज घरांघरांवर तिरंगा फडकत आहे.

ते पुढे म्हणाले आज स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत. मात्र देशातील गरिबी नरेंद्र मोदींच्या काळात कमी झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते 2014 पर्यंत भारतात गरिबी होती. त्यानंतर देशातील यांनी एकत्र यायचं ठरविले. आणि सर्व गरीब एकत्र झाल्यानंतर देशात गरिबांचा प्रधान मंत्री झाला.

2014 पर्यत गरिबी हटली नाही, त्यानंतर सर्व गरीब एकत्र झाले, नरेंद्र मोदींसारखा गरीब पंतप्रधान झाला.. त्यानंतर भारतातून प्रत्येक घर विकसित होऊ लागलं आहे. प्रत्येक घरात शिक्षण मिळू लागले आहे. त्यामुळे रोजगार मिळू लागला आहे. परिणामी गरिबी देशातून हद्दपार होते आहे. असा विश्वास यावेळी दानवे यांनी व्यक्त केला.

Team Global News Marathi: