“मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर मी राणा दाम्पत्याच्या विरोधात.” अब्दुल सत्तार यांचे खुले आव्हान

 

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांची न्यायालयाकडून सशर्त जामीनावर सुटका झाली. मात्र रविवारी खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांना निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले. त्यांच्या या आव्हानाला आता शिवसेनेकडून सडेतोड उत्तर देण्यात येत आहे. यामध्ये महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांचाही समावेश आहे.

बीडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनाच थेट आव्हान दिले आहे “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे मत अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.

“राणा चार आणेसारखी गोष्ट करत आहेत. चारआणेवाला इतक्या मोठ्या डोंगराला आव्हान करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे जे बोलले ते ते त्यांनी केले. त्यांचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देशात नाव आहे. काही लोकांना बोलण्यासाठी माईक पाहिजे, काही तरी विषय पाहिजे. म्हणून ते अशा विषयांवर बोलतात. मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिला तर मी अमरावतीत जाऊन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल.

Team Global News Marathi: