मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर

राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच दौऱ्यावर असून काही दिवसांपूर्वी ते नाशिकच्या स्वामी नारायण मंदिराच्या उदघाटनासाठी नाशिकमध्ये आले होते. त्यांनतर आज नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दादा भुसे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत..

दरम्यान, नाशिकमध्ये पहिले वहिले शिंदे गटाचे संपर्क कार्यालय उभारण्यात आले असून त्याच्या उदघाटनासाठीचा महत्वाचा कार्यक्रम समजला जात आहे. शिंदे गटाच्या आगामी पायाभरणी साठी हे महत्वाचे केंद्र असणार आहे. काही दिवसांनी नाशिक महापालिका निवडणुका रंगणार आहे.

याच पार्श्वभूमीवर त्यादृष्टीने देखील तयारीचा श्री गणेशा हे कार्यालय ठरण्याची शक्यता आहे. तर अलीकडेच अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्ते हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे समजते. यांचा प्रवेश सोहळा या निमित्ताने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठाकरे गटासह इतर कोणते पदाधिकारी शिंदे गटाची वाट चोखळतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने दोन पक्षाला वेगवेगळे नाव दिलेले आहेत. आणि एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिल्यानंतर याच नावाचं मुंबईनंतर नाशिकमध्ये पहिलं कार्यालय स्थापन करण्यात आलेल आहे. बाळासाहेबांची शिवसेना नाशिक कार्यालय हे भव्य असं कार्यालय आहे. नाशिक शहरातील जिल्हा परिषदेच्या जवळ खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाच्या बाजूलाच उभ करण्यात आलेल आहे.

Team Global News Marathi: