मुख्यमंत्री अपात्र ठरल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता’ राष्ट्र्वादीने वर्तवली शक्यता

 

शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या वादांवर आणि विविध याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या घडामोडीकडे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत पहिल्यांदा बाहेर पडलेल्या आणि बंडाचे निशाण फडकविणाऱ्या 16 आमदारांवर शिवसेनेने अपात्रतेची कारवाई केली होती. त्यांला शिंदे यांनी न्यायालयात आव्हान केले होते.

शिवसेनेवर कोणाचा हक्क राहणार, धनुष्यबाण कोणाचे, अपात्र आमदारांचे काय, अशा विविध यांचिंकावर आज सुनावणी होणार आहे. अपात्र आमदारांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचा देखील समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरविले, तर राज्यातील सरकार कोसळणार आहे. त्यामुळे तत्पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याची शक्यता असल्याचे वर्तविले आहे.

सर्वोच्च न्यायालयाता सुनावणी सुरु आहे. काही चुकीचे घडत असल्याते निदर्शनास आल्यास न्यायालय कारवाई करेल. आणि त्यानुसार न्यायालय निर्णय घेईल, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. न्याय द्यायचा नसेल, तर तो लांबणीवर टाकणे हा दुसरा पर्याय आहे. त्यामुळे तो लांबणीवर टाकला जाऊ शकतो. आम्हाला देखील उत्सुक्ता आहे, या देशातील न्यायालय कसे वागते, असे जयंत पाटील म्हणाले.

Team Global News Marathi: