मुख्यमंत्री 20 तास काम करतात, हे लोकांच्या डोळ्यांमध्ये खुपतंय

 

खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपले वडील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक करत विरोधकांना टोला लगावला आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 20 तास काम करतात, हे लोकांच्या डोळ्यांमध्ये खुपतंय”, असं श्रीकांत शिंदे म्हणालेत. तसंच विरोधकांना जिथं-तिथं फक्त एकनाथ शिंदेच दिसतात. विरोधकांच्या तर स्वप्नातही एकनाथ शिंदे येतात, असंही ते म्हणालेत.

राज्यामध्ये जे सरकार आले ते मेजॉरिटीचं सरकार आहे. बाकी लोक बोलत असतात. त्यांचं ते कामच आहे. विरोधी बाकावर बसल्यापासून त्यांच्याकडे करण्यासारखं काहीही उरलेलं नाही. त्यामुळे विरोधक सरकारवर टीका करतात, असंही श्रीकांत शिंदे म्हणालेत. गणेशोत्सव काळात एकनाथ शिंदे यांनी विविध ठिकाणी जात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली. त्याला आता श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आता शिंदेसाहेब चांगलं काम करत आहेत. विरोधकांना पूर्ण वेळ केवळ शिंदेसाहेबच दिसतात. स्वप्नामध्ये पण शिंदे साहेब येतात. सगळ्यांच्या म्हणजे शिंदेसाहेब गणेश उत्सवामध्ये ज्या प्रकारे फिरले. फक्त गणेश उत्सव नाही, त्याबरोबर शासकीय कामकाज सरकारचे निर्णय घेण्याचे निर्णय शिंदे साहेबांनी घेतले. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा माणूस काम कसा करू शकतो? असा प्रश्न विरोधकांना पडलाय, असंही शिंदे म्हणालेत.

Team Global News Marathi: