अरविंद सावंत अन् नवनीत राणांसारख्या निर्लज्ज राजकारण्यांचा धिक्कार

 

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे-शिंदे गटात सुरु असलेल्या तणावाचं रुपांतर मारामारीत झाल्याचं दादरमध्ये पाहायला मिळालं. गणेश विसर्जन मिरवणुकीच्यावेळी प्रभादेवीत शिंदे गटाचे सरवणकर समर्थक कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. अखेर, पोलिसांच्या मध्यस्थीने वेळीच संघर्ष टळला. मात्र या वादाचे पडसाद पुन्हा उमटले आहेत.

त्यातच, खासदार अरविंद सावंत आणि एका पोलिसामध्ये बाचाबाचीही झाली. त्यावरुन, आता मनसेनं शिवेसना खासदार अरविंद सावंत आणि खासदार नवनीत राण यांच्यावर निशाणा साधला आहे. अशा निर्लज्ज राजकारण्यांचा धिक्का असो, असे ट्विट मनचिसेच्या अमेय खोपकर यांनी केले आहे.

दादरमध्ये दोन गटांतील राड्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत दादर पोलीस स्थानकात दाखल झाले. पोलीस स्थानकांत दाखल होताच अरविंद सावंत आणि तेथील एका पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याचं दिसून आलं. दोनच दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनीही पोलिसांना पोलीस स्थानकात जाऊन चांगलंच सुनावलं होतं. त्यानंतर, पोलीस पत्नीने संताप व्यक्त करत नवनीत राणा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आता, खासदार अरविंद सावंत यांचीही पोलिसांसोबत तू-तू मै-मै झाल्याने मनसेनं संताप व्यक्त केला आहे. मनचिसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करुन या दोन्ही नेत्यांचा धिक्कार असो, असे म्हटले.

पोलिसांचा अपमान करणाऱ्या अरविंद सावंत यांच्यासारख्या खासदाराला अगोदर तुरुंगात डांबलं पाहिजे. पोलिसांचा असा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही. नवनीत राणा, अरविंद सावंतांसारख्यांना कधीच जबाबदार राजकारणी म्हणू शकत नाही. अशा निर्लज्ज राजकारण्यांचा धिक्कार, असे ट्विट खोपकर यांनी केली आहे.

Team Global News Marathi: