एमपीएससी परीक्षेची तारीख जाहीर, या तारखेला होणार परीक्षा

मुंबई : एमपीएससी परीक्षेची तारीख राज्य सरकारकडून पुढे ढकलण्यात आल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. पुणे, नागपूर, कोल्हापूर, संभाजीनगर, नाशिक आदी शहरांत एमपीएससी परीक्षार्थी रस्त्यावर उतरले होते या झालेल्या गोंधळानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी नवीन तारीख जाहीर करण्यात येईल असे स्पष्टीकरण दिले होते.

त्यानुसार नवी तारीख जाहीर करण्यात आली असून २१ मार्चला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षा (MPSC) होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अधिकृत प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती देण्यात आली आहे.

प्रसिद्धीपत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, १४ मार्च रोजी नियोजित करण्यात आलेल्या परीक्षेकरिता आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवारांना वितरित करण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्रांच्या आधारे नमूद परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना प्रवेश दिला जाईल.

Team Global News Marathi: